Sunday, May 30, 2010

संगणकीय मराठी टायपिंगमध्ये सर्व श्रेष...

संगणकीय मराठी टायपिंगमध्ये सर्व श्रेष्ठ कोण? 'मायक्रोसॉफ्ट', 'गुगल' की 'सोप्पी मराठी'?
'मायक्रोसॉफ्ट' व 'गुगल' यांनी दिली आहे मराठीसाठी Transliteration ची सुविधा. 'गुगल' मध्ये तुम्ही kurhad असे इंग्रजीत लिहिलेत की पुढील पर्याय तुम्हाला उपलब्ध होतात! 'कुर्हाड, कुर,हाड, कुर्‍हाद, कुरहाड, कुरहाद' पण तुमच्या मनातलं 'कुर्‍हाड' तेथे नसते! तुम्ही kurhad असे 'मायक्रोसॉफ्ट' मध्ये इंग्रजीत लिहिलेत की 'कुर्‍हाड' बरोबर 'कुरड, कुरद, कुराड' असे पर्याय उपलब्ध केलेले असतात! 'मायक्रोसॉफ्ट' असो वा 'गुगल' तुम्हाला तुमच्या मनातलं मराठी कुठे टाईप करता येते?
मराठी शब्दात असतात 'मराठी अक्षरे'. 'मराठी अक्षरात' असतात मराठी 'व्यंजन-स्वर-अनुस्वार-विसर्ग-विराम'. 'मराठी अक्षराला' असतो उच्चार. 'मराठी अक्षराचा' उच्चार दाबलेल्या प्रत्येक चावीतून संगणकात क्रमवार उतरला पाहिजे. शब्द 'कुर्हाड, कुर्‍हाद, कुरहाड, कुरहाद, कुरद, कुराड' कोणताही असो, शब्दाच्या उच्चारानुसार त्यातल्या अक्षरांच्या क्रमाप्रमाणे तो जसाच्या तसा लिहिता आला पाहिजे. त्यासाठी Transliteration या पांगुळगाड्याची गरज कशाला? 'मायक्रोसॉफ्ट' व 'गुगल' यांना जे जमले नाही, ते 'शोध मराठीचा' संशोधनाच्या 'सोप्पी मराठीने' साकारले आहे. 'सोप्पी मराठी'च्या वापरातून आता युनिकोडमध्येही मराठीचा मराठीसाठी मराठीपणातून विचार करत टाईप करता येते. त्याला आम्ही 'मराठी युनिकोड' असे नाव दिले आहे. <www.shodhmarathicha.com> या साईटवरून ते आता डाउनलोड करून, आमच्या बँकेत 315 रूपये ट्रान्स्फर करून, विकत घेता येते. त्यानंतर तुम्हाला त्यासाठीचा 'डिकोड' ईमेलने पाठविला जातो.
आता तुम्हीच ठरवा संगणकीय मराठी टायपिंगमध्ये सर्वश्रेष्ठ कोण? 'मायक्रोसॉफ्ट', 'गुगल' की 'सोप्पी मराठी'?
http://attachments.wetpaintserv.us/SVHfK8smuAiDduNXAvTOMA144609

No comments:

Post a Comment